उपजिल्हा रुग्णालय परिसरातील झाड कारवर कोसळले…

कारचे नुकसान; झाड बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू

⚡सावंतवाडी ता.०६-: उपजिल्हा रुग्णालय परिसरात असणारे झाड आज एका कारवर कोसळले असून, या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी हे झाड बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू होते.

You cannot copy content of this page