मनसेची कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात गांधीगिरी

रस्त्यावरील खड्डे बुजवत प्राधिकरण व प्रशासनाचा केला निषेध

⚡कणकवली ता.०६-: मनसेने गांधीगिरी करत प्रशासनाला जाग आणण्यासाठी अनोखे आंदोलन कणकवली येथिल आप्पासाहेब पटवर्धन चौकात केले. व रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवित महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासन व ठेकेदाराचा निषेध केला.तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वर पार ‘ , ‘ मनसेचा विजय असो ‘ , ‘ एकदाच घुसणार , मनसेचे दिसणार ‘ अशी घोषणाबाजी मनसैनिकांनी करून परिसर दणाणून सोडला .

यावेळी मनसेचे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर , दीपक गुरव , अरविंद घाडीगावकर , संतोष कुडाळकर , शांताराम सादये , प्रकाश घाडीगांवकर , प्रशांत उपरकर , सागर तोडणकर , शरद सावंत , सोनू तांबे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते .
कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत . हे खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असून ते बुजवण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महामार्ग ठेकेदाराकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आप्पासाहेब पटवर्धन चौकात पडलेले खड्डे मनसैनिकांनी बुजवून महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासन व ठेकेदाराचा निषेध केला .कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत . हे खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असतानाही ते बुजवण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महामार्ग ठेकेदार यांच्याकडून कोणताही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ मनसैनिकांनी बुधवारी सायंकाळी सुमारास सर्व्हिस रोडवरील खड्डे खडी टाकून बुजवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारचा निषेध केला .

You cannot copy content of this page