दोडामार्ग ता.०६-:
दोडामार्ग तालुक्यातील सर्वात जुने असलेले कळणे सब पोलीस स्टेशनची पडझड कालच्या पावसात झाली. एकाबाजूची भिंत कालच्या पावसात कोसळली. ही पोलीस चौकी कोरोनंतर बंदच होती असे इथले ग्रामस्थ सांगतात. या ठिकाणी ड्युटीवर पोलीस पण नसतो त्यामुळे इथल्या लोकांची गैरसोय होते आता सदरची चौकीची इमारतच कोसळल्याने इथल्या सुरक्षेच्या मर्यादाही समोर आल्या आहेत.
कळणे पंचक्रोशीतील अनेक गावांसाठी ही पोलीस चौकी कायमच आशेचा किरण होती गावातील तंटे, चोरीची प्रकरणे याच चौकीतुन न्यायाला जायची. त्यामुळे ही पोलीस चौकी इथल्या नागरिकांसाठी सुरक्षा कवच होती त्यामुळे तिची योग्य डागडुजी करून त्याठिकाणी कायम स्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
