Headlines

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर म्हापणमध्ये गॅस सिलेंडरची टंचाई !

कुडाळ : वेंगुर्ले गॅस एजन्सी कडून वेळेत व पुरेसा गॅस सिलेंडर पुरवठा होत नसल्याने म्हापण पंचक्रोशीत गॅस सिलेंडरची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. मागणी प्रमाणे अपेक्षित सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून ग्राहकांनी म्हापण तिठा येथे सिलेंडर साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, मात्र उशीरा पर्यत वेंगुर्ले गॅस संघाची गाडीच म्हापण येथे न आल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. वारंवारं गॅस एजन्सीशी संपक साधल्या नंतर सायंकाळी सुमारे ८० ग्राहकांना गॅस सिलेंडर देण्यात आले. मात्र अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ शकला नाही याबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वेंगुर्ले गॅस एजन्सी कडून ग्राहकांना वेळेवर गॅस पुरवठा करण्यात दिरंगाई केली जाते. याबाबत ग्राहकांनी संबंधित गॅस एजन्सी चालक यंत्रणेशी वारंवार संपर्क साधून आपली मागणी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र एजन्सी कडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. गेल्या काही दिवसापासून गॅस सिलेंडरची टंचाई मोठ्या प्रमाणावर असूनही संबंधित एजन्सी कडून ग्राहकांच्या फोनला उत्तर न देण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. याबाबत ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून ग्राहक आपल्या रिकाम्या सिलेंडर सह म्हापण तिठा येथे रांग लाऊन उभे होते. मात्र संबंधित एजन्सीचा कडून गॅस पुरवठा होण्यास खूप विलन विलंब झाला. वारंवार ग्राहकांकडून तसेच अन्यथा राजकीय नेत्यांकडून एजन्सीला दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र एजन्सीने त्या दूरध्वनींना रिप्लाय येत नसल्यामुळे ग्राहकांमधील संताप अधिक वाढत गेला. अखेर सायंकाळी सिंलेडर उपलब्ध झाले. काही ग्राहकांना सिलेडर मिळू शकले नाही गणेश चतुर्थी असल्याने तरी दोन दिवसात शनिवार पर्यत तरी सिलेंडर उपलब्ध करून दयावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

You cannot copy content of this page