Headlines

रुपेश पावसकर यांनी घेतली जि. प. सीईओ डॉ. अपूर्वा बासुर यांची भेट

जिल्ह्यातील विविध प्रशांकडे वेधले लक्ष

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. अपूर्वा बासुर (I.A.S.) यांची जिल्हा परिषद सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयातील दालनात औपचारिक भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि समस्यांबाबत डॉ. बासुर यांचे लक्ष वेधण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष परब यांनी नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. स्वागत सत्कारानंतर पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे व समस्यांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि स्थानिक नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात, यासंदर्भात सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली.
​ या निवेदनावर सकारात्मक विचार करून जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तात्काळ योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी यावेळी दिले.

You cannot copy content of this page