बांदा येथे पूर अलर्ट सायरनचे उद्घाटन

पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केला शुभारंभ

⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात पूर अलर्ट देण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सहकार्यातून आळवाडी येथे बसविण्यात आलेल्या सायरनचे उदघाटन बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सरपंच अक्रम खान, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, राजेश विरनोडकर, श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे राकेश केसरकर, सौ दर्शना केसरकर, मंगलदास साळगावकर, रवींद्र मालवणकर, प्रीतम हरमलकर, मनोज कल्याणकर, गौरांग शेर्लेकर, संदेश पावसकर, ज्ञानेश्वर केसरकर आदिसह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
. पोलीस निरीक्षक श्री काळे म्हणाले कि, तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका हा बांदा शहराला बसतो. आळवाडी येथील व्यापाऱ्यांची दुकानें व घरे यांना सर्वाधिक धोका असल्याने व रात्रीच्या वेळी अचानक शिरलेल्या पाण्याची स्थानिकांना कल्पना यावी यासाठी याठिकाणी सायरन बसविण्यात आले आहेत. याचे व्यवस्थापन पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा भक्त सेवा मंडळ करणार आहे. यावेळी सायरनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच सायरान कशा पद्धतीने व किती वेळेत वाजविण्यात येईल याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.

You cannot copy content of this page