Headlines

स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या हस्ते कुडाळमध्ये वृक्षारोपण मोहीम

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार

कुडाळ : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहरात ‘एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ या सामाजिक संदेशातून भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मुख्य कार्यक्रम शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठलवाडी क्रीडांगण (तहसीलदार मैदानाशेजारी), कुडाळ येथे होणार आहे. याशिवाय कुडाळ शहरातील विविध ठिकाणीही वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
“देशासाठी बलिदान, पर्यावरणाचे रक्षण” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पर्यावरणप्रेमी नागरिक, विविध सामाजिक संस्था तसेच कुडाळ शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाट व शिवसेना कुडाळ शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page