गाडीच्या मागे आणि पुढे एकाच वेळी पडले झाड; सुदैवाने जीवितहानी नाही…
वैभववाडी प्रतिनिधी
मंगळवारी राञी ९.४५ वा. सुमारास जोरदार पाऊस पडत होता… रस्त्यावर पुढे आडवे झाड पडले म्हणून गाडी मागे घेत असताना मागेही रस्ते पिंपळाचे मोठे झाड पडले. सुदैवाने या अपघातातून कुसूर येथील नर्सरीचे मालक श्रीराम पळसुळे रा. कुसूर हे बालबाल बचावले आहेत. कुसूर ग्रामस्थांनी दोन्ही झाडे कट्टर मशिनने कापून मार्ग मोकळा केला.त्यामुळे वैभववाडी उंबर्डे मार्गावरील वाहातूक अर्धा पाऊन तास ठप्प झाली होती. रस्त्याकडेच्या धोकादायक झाडांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून यामुळे अपघात घडून जिवीत हानी होण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. रस्त्याकडेची धोकादायक झाडे तोडण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
वैभववाडी तालुक्यात दोन तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. कुसूर येथील नर्सरी मालक श्रीराम पळसुले हे आपली मारुती ओमणी गाडी घेऊन राञी वैभववाडी येथील कृषीसेवा केंद्र बंद करुन घरी चालले होते. सोनाळी येथील मोरीजवळ आले असता त्यांच्या समोर रस्त्यावर एक झाड मोठे पडले होते. त्यांनी गाडी थोडी मागे घेतली त्याचवेळी त्यांच्या पाठीमागे अगदी गाडीला घासून पिंपळाचे झाड उमळून पडले. अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांना काही समजेना ते गाडीत ऊतरुन बाहेर आले. सुदैवाने गाडी व ते स्वतः या अपघातातून बचावले आहेत. दरम्यान त्यांनी ही माहीती दूरध्वनीवरुन कुसूर गावचे माजी सरपंच संतोष पाटील यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्यासोबत धनाजी दळवी, श्री. सोगम, आबा कुळये यांना घेऊन आपल्या गाडीने ते घटनास्थळी आले. त्यांनी भर पावसात कट्टर मशिनच्या साहाय्याने दोन्ही झाडे कापून रस्ता मोकळा केला. माजी सरपंच पाटील यांचे प्रवाशांनी धन्यवाद मानले. दरम्यान सुमारे अर्धा पाऊण तास वैभववाडी उंबर्डे मार्ग ठप्प झाला होता.
वैभववाडी तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या धोकादायक झाडे तोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. फोंडा उंबर्डे तसेच खारेपाटण भुईबावडा या महत्वाच्या व रहृदारीच्या रस्त्याकडेची झाडे सर्व्हे करुन तोडण्यात यावी. अशी मागणी केली जात आहे.
चौकट-
आठ दिवसापूर्वी गडमठ येथील सोसायटी सचिव श्री. वाडेकर हे आपल्या मोटारसायकलने कामानिमित्त वैभववाडी येत असतांना अचानक रस्त्याकडेचे झाड पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यांवर कोल्हापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
फोटो- सोनाळी येथे रस्त्यावर पडलेले झाड.
छाया- संजय शेळके वैभववाडी
