Global Maharashtra Breaking News

अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…

मनसेची कुडाळ तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ ता.०८-:कुडाळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यात मिरची, भुईमूग, वायंगणी भातशेती, चवळी ,आंबा, काजू, सूर्यफूल, केळी बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी कुडाळ मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल पाठक यांच्याकडे केली आहे….

Read More

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कणकवली तालुका शाखा स्थापनेबाबत १० एप्रिल रोजी बैठक

कणकवली ता.०८-:* भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित आणि शासनमान्य असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेची कणकवली तालुका शाखा स्थापन करण्याबाबतची विशेष बैठक रविवार १० एप्रिल रोजी सकाळी ठिक १०.३० वा. महाराजा हॉटेल, विद्यामंदिर समोर कणकवली येथे आयोजित केली आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्राहक…

Read More

मारुती स्टॉप येथे ११ पासून दशावतारी नाटकांचे आयोजन

वेंगुर्ला ता.०८-:* वेंगुर्ला मारुती स्टॉप येथील हनुमान मंदिरात ११ एप्रिलपासून सार्वजनिक हनुमान जयंतीला प्रारंभ होत असून यानिमित्त दशावतारी नाट्य मंडळांचे नाट्यप्रयोग होणार आहे. यात दि.११ रोजी ओंकार दशावतार नाट्यमंडळ-उभादांडा, दि.१२ रोजी श्री रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ-वेंगुर्ला, दि.१३ रोजी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ-तेंडोली, दि.१४ रोजी सद्गुरु दशावतार नाट्यमंडळ-वेंगुर्ला यांचा समावेश आहे. वरील सर्व नाट्यप्रयोग सायं.७ वा. सुरु होणार…

Read More

स्थापना दिनानिमित्त दिव्यांगांना भेटवस्तू प्रदान

वेंगुर्ला प्रतिनिधी– भाजपा स्थापना दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी भाजपा ध्वज फडकविण्यात आला. शिवभवानी गजान्तलक्ष्मी संस्थान सोन्सुरे येथे शिरोडा, आरवली, सागरतीर्थ येथील ३० दिव्यांग व्यक्तींना संस्थाचे प.पू.आजोबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू वितरीत करण्यात आले. यावेळी संस्थानचे दिपक गावडे, डॉ.एकसष्टी चिपकर, भाजपाचे प्रितेश राऊळ, प्रसन्ना देसाई, बाबली वायंगणकर, सुहास गवंडळकर, श्रीकृष्ण धानजी, दादा केळुसकर,…

Read More

स्वामीराज प्रकाशन व वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने निबंध स्पर्धा

कणकवली ता.०८-:* मराठी आठव दिवस उपक्रमांतर्गत स्वामीराज प्रकाशन आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान,कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या स्वरुपात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या निबंध स्पर्धेचा विषय ‘ बोली भाषेमुळे मराठी फक्त शाळेतच कोंडून राहते का ? ‘ हा असून शब्द मर्यादा ५०० ते ७०० आहे . या स्पर्धेकरिता प्रथम तीन क्रमांकांसाठी पारितोषिके…

Read More

मालवण शहरातील हेरिटेज वृक्षांच्या माहिती संकलनाचे काम नगरपालिकेकडून सुरू

मालवण ता.०८-:* पर्यावरण संवर्धनासाठी मालवण नगरपरिषदेने एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. मालवण शहरात अनेक वर्षांपासून शहराच्या विकासाचे साक्षीदार असलेल्या, पर्यावरण संतुलनात भर घालून शहराच्या आरोग्यदायी वातावरणात मोठा वाटा असलेल्या ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोमान असणाऱ्या “हेरीटेज वृक्षाच्या” माहिती संकलनाचे काम मालवण नगरपरिषदेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. मालवण शहरात असे हेरीटेज वृक्ष असल्यास…

Read More

डॉ.आंबेडकर भारतीयांसाठी प्रेरणास्थान – प्रा. नागेश कदम

मालवण ता.०८-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन सुनितादेवी अध्यापक महाविद्यायलाचे प्रा. नागेश कदम यांनी मालवण येथील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक…

Read More

मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील ८४ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

मालवण ता.०८-:* मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन मालवण या पदविका अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थेमधील तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी,यंत्र अभियांत्रिकी,विद्युत अभियांत्रिकी व अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये शिकणाऱ्या ८४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो, फ्लीपकार्ट, डेटास्टेक, ऍडविक टेक्नोलॉजी या विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. याव्यतिरिक्त एल.एन.टी. ,इन्फोसिस , जी.ई. ,टी.सी.ई. , टाटा मोटर्स आदी अनेक इंडस्ट्रीजमध्ये विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया चालू…

Read More

बॅ. नाथ पै जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा संपन्न

मालवण ता.०८-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण व सिंधुदुर्ग शिक्षक भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाथ पै जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे झाली. परीक्षेत हायस्कूलमधील २४५ विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धा परीक्षेचा उद्घाटन समारंभ शालेय समिती अध्यक्ष व पत्रकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. दीपक भोगटे यांनी विद्यार्थ्यांना नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त…

Read More

बार्टीच्या निबंध स्पर्धेत श्रद्धा पाटकर प्रथम

मालवण ता.०८-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) समतादूत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यावतीने सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजीत जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर झाला आहे. निबंध स्पर्धेत कणकवली येथील श्रद्धा सतीश पाटकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कुडाळ येथील शितल किरण कदम यांनी द्वितीय तर मालवणच्या माधवी लिलाधर तिरोडकर यांनी तृतीय…

Read More
You cannot copy content of this page