मारुती स्टॉप येथे ११ पासून दशावतारी नाटकांचे आयोजन

वेंगुर्ला ता.०८-:* वेंगुर्ला मारुती स्टॉप येथील हनुमान मंदिरात ११ एप्रिलपासून सार्वजनिक हनुमान जयंतीला प्रारंभ होत असून यानिमित्त दशावतारी नाट्य मंडळांचे नाट्यप्रयोग होणार आहे. यात दि.११ रोजी ओंकार दशावतार नाट्यमंडळ-उभादांडा, दि.१२ रोजी श्री रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ-वेंगुर्ला, दि.१३ रोजी वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ-तेंडोली, दि.१४ रोजी सद्गुरु दशावतार नाट्यमंडळ-वेंगुर्ला यांचा समावेश आहे. वरील सर्व नाट्यप्रयोग सायं.७ वा. सुरु होणार आहेत.

दि. १५ रोजी सायं.७ वा. ब्राह्मण प्रासादिक मंडळाचे भजन होणार तर शनिवार दि.१६ एप्रिल हनुमान जयंती दिवशी पहाटे ४.३०वा. मारुतीला अभिषेक व पूजा, पहाटे ५ वा. ह.भ.प.डॉ.रमेश पाटकर (माणगांव) यांचे कीर्तन, सकाळी ६ वा. मारुती जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद, सायं. ५ वा. श्रीसत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, सायं. ७ वा. देवेंद्र नाइ्रक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. उत्सव कालावधीत रोज सायं.६.३० वा. मारुतीची आरती होईल. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page