वेंगुर्ला प्रतिनिधी– भाजपा स्थापना दिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी भाजपा ध्वज फडकविण्यात आला. शिवभवानी गजान्तलक्ष्मी संस्थान सोन्सुरे येथे शिरोडा, आरवली, सागरतीर्थ येथील ३० दिव्यांग व्यक्तींना संस्थाचे प.पू.आजोबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भेटवस्तू वितरीत करण्यात आले.
यावेळी संस्थानचे दिपक गावडे, डॉ.एकसष्टी चिपकर, भाजपाचे प्रितेश राऊळ, प्रसन्ना देसाई, बाबली वायंगणकर, सुहास गवंडळकर, श्रीकृष्ण धानजी, दादा केळुसकर, लक्ष्मीकांत कर्पे, मनोहर होडावडेकर, अनिल गावडे, मनोज उगवेकर, प्रकाश रेगे, सायली कुडव, समिर कांबळी, तातोबा कुडव, जगन्नाथ राणे, विद्याधर धानजी, रविद्र कुडाळकर, पपू चिपकर, संतोष मातोंडकर, वेणू चिपकर, ज्ञानेश्वर केरकर, ओंकार कोनाडकर, सोमकांत सावंत, बाळू वस्त यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, ६ ते १४ एप्रिल पर्यत वेंगुर्ला तालुक्यामध्ये विविध ठिकाणी समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.
