.⚡सावंतवाडी ता.११-: श्री देव राष्ट्रोळी मंदिर आरोंदा जोशीवाडा येथे बुधवार १३ मे व गुरुवार दि. १४ मे रोजी
श्री गणेश , श्री राष्ट्रोळी वर्धापन दिन व सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम- बुधवार दि. १३ मे रोजी
श्री गणेश पुजन, अभिषेक, कुंकूमार्चन व आरती, सायं. ७ वा. श्री राष्ट्रोळी मित्रमंडळाचा भजनाचा कार्यक्रम.
गुरुवार दि. १४ मे रोजी,सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापुजा,दुपारी १२ वा. आरती व महाप्रसाद.
सायं. ७ वा. ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन तसेच रात्रौ ९.३० वा.श्री राष्ट्रोळी मित्रमंडळाच्या हौशी कलाकारांचा दोन अंकी नाट्यप्रयोग “यदा कदाचित” होणार आहे. नाटकाचे लेखक संतोष पवार असून दिग्दर्शक रुपेश कवठणकर, पप्पी कवठणकर तर नेपथ्य यश रंगमंच आरोंदा (गणेश गडेकर)यांचे आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापक श्री देव राष्ट्रोळी मित्रमंडळ, जोशीवाडी आरोंदा व ग्रामस्थांनी केले आहे.
आरोंदा १३ व १४ मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
