अवकाळी मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…

मनसेची कुडाळ तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

कुडाळ ता.०८-:कुडाळात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यात मिरची, भुईमूग, वायंगणी भातशेती, चवळी ,आंबा, काजू, सूर्यफूल, केळी बागायती चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी कुडाळ मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे तहसीलदार अमोल पाठक यांच्याकडे केली आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका सचिव राजेश टंगसाळी, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, विभाग अध्यक्ष सुंदर गावडे, रामा सावंत, शाखाध्यक्ष वैभव धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page