Headlines

Global Maharashtra Breaking News

कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरत्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक सावंत यांची निवड…

तर उपाध्यक्षपदी राजू वाळके, सचिव संजय नाईक… बांदा/प्रतिनिधीयेथील कट्टा कॉर्नर सार्वजनीक नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक सावंत तर उपाध्यक्षपदी राजू वाळके, सचिवपदी संजय नाईक, तर खजिनदारपदी सलील वळंजू यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठकी मध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.या बैठकीमध्ये विविध‌ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार…

Read More

बंदर विभाग आणि जलक्रीडा व्यावसायिक बैठक संपन्न

एक खिडकी सुविधेसह जलक्रीडाचे दर करण्यात आले निश्चित मालवण (प्रतिनिधी) गेली काही वर्षे जलक्रीडा व्यवसायात वादातीत बनलेल्या समान तिकीट दर निश्चितेची एक खिडकी योजना व्हावी यासाठी मालवणच्या बंदर विभागाने पुढाकार घेत आज या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत जलक्रीडा व्यवसायाचे दर निश्चित करताना एक खिडकी योजना व्हावी यासाठी ठोस निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतानाच जलक्रीडा…

Read More

ऊँकार मित्रमंडळाच्या देवीचे वाजत गाजत आगमन…

⚡सावंतवाडी-: सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ येथील देवीचे आज वाजत गाजत मिरवणुकीने आगमन झाले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल शृंगारे, सल्लागार माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर, दिलीप भालेकर, राजा दळवी, रमेश परब, संतोष खंदारे, विजय सावंत, भार्गव धारणकर व इतर.

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ अखेर रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात…

⚡सिंधुदुर्ग दि.२४-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आली असून, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकत्व सोपविण्यात आले आहे.

Read More

पर्यटनाचा पुनर्वापर या विषयावर २७ रोजी ऑनलाईन व्याख्यान

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आयोजन वैभववाडी संजय शेळकेमाउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना यांच्यावतीने २७ सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पर्यटनाचा पुनर्वापर’ या जागतिक पर्यटन दिनाच्या संकल्पनेवर आधारित ‘कोकणचे पर्यटन- दशा आणि दिशा’ या विषयावर पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री.विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांचे गुगल मिट…

Read More

विजयदुर्ग रामेश्वर समुद्र किनारी डाबर सदृश पदार्थ

⚡देवगड ता.२४-: विजयदुर्ग रामेश्वर समुद्र किनारी जहाज बुडीनंतर शनिवारी सकाळी पहिल्यांदा किनाऱ्यावर डाबर सदृश पदार्थ यायला सुरवात झाली असुन या समुद्र किनारी उपजिल्हाधिकारी ( रोहयो ).आविशकुमार सोनोने , तहसिलदार श्रीकृष्ण ठाकुर , देवगड गटविकास अधिकारी . अरूण चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर करावयाचे उपाय योजनेबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायतीशी सुसंवाद साधला . या आपत्कालीन परिस्थितीशी…

Read More

जिल्हास्तरीय स्वरचित काव्य स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२४-:नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे कवी स्व. शरद साटम यांच्या स्मृति प्रित्यर्थ जिल्हास्तरीय कवी शरद साटम स्वरचित काव्य स्पर्धा रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी कविता स्वरचित व मराठी असावी. सामाजिक, प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. कविता दिर्घ नसावी. स्पर्धकाने आपल्या कवितेचे स्वतःच सादरीकरण…

Read More

भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सीइओ विलास गोलतकर यांचे निधन

⚡मालवण ता.२४-: मूळ हडी पाणखोल जुवा गावचे सुपुत्र आणि भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास दाजी गोलतकर (वय ७४) यांचे शुक्रवारी कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. श्री. विलास गोलतकर हे नोकरीच्या निमित्ताने मुंबई डोंबिवली येथे राहत होते तर मुंबई ठाणे येथील सायन्स कॉलेज मध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक…

Read More

,खा केतकर डाॅ.मुणगेकर यांचे महेंद्र सांगेलकर यांनी केले स्वागत

⚡सावंतवाडी ता.२४-: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार कुमार केतकर व डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे सिंधूदुर्ग जिल्हात आले असता त्यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख कॉग्रेस नेते विकास सावंत माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथ चव्हाण महिला जिल्हा अध्यक्ष सौ साक्षी वंजारी रवींद्र म्हापसेकर, अमीदि मेस्त्री, असलम.खतीब,…

Read More

नौका दुर्घटनेतील बेपत्ता विष्णू राऊळ यांच्या कुटूंबियांची आ.वैभव नाईक यांनी केली विचारपूस

⚡मालवण ता.२४-: मालवण-देवबाग खाडी किनारी झालेल्या नौकेच्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ यांच्या कुटूंबियांची काल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत विचारपूस केली व कुटूंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेष परब, किरण वाळके, मोरेश्वर धुरी, अनिल केळुस्कर आदी उपस्थित होते.

Read More
You cannot copy content of this page