कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरत्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक सावंत यांची निवड…

तर उपाध्यक्षपदी राजू वाळके, सचिव संजय नाईक…

बांदा/प्रतिनिधी
येथील कट्टा कॉर्नर सार्वजनीक नवरात्रौत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक सावंत तर उपाध्यक्षपदी राजू वाळके, सचिवपदी संजय नाईक, तर खजिनदारपदी सलील वळंजू यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठकी मध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीमध्ये विविध‌ धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार दि. २६ रोजी श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल. यादिवशी दत्त माऊली पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ दाबोली (वेंगुर्ले) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवार दि. २७ रोजी डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, फोंडाघाटचे बुवा प्रथमेश चव्हाण व श्री पडेलकर प्रासादिक भजन मंडळ धालवली, देवगडचे बुवा अखिलेश फाळके यांच्यात सामना होणार आहे. चव्हाण यांना मिलिंद लाड पखवाज तर प्रथमेश लाड तबला साथ करणार आहेत. फाळके यांना रोहित मोंड हे पखवाज तर विराज पेडणेकर हे तबला साथ करणार आहेत. बुधवार दिनांक २८ रोजी ओंकार कलामंच, सावंतवाडी यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दिनांक २९ रोजी २०-२० डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. वडची देवी प्रासादिक भजन मंडळ लिंगडाळ, देवगडचे बुवा संदीप लोके व श्री भुतेश्वर प्रासादिक भजन मंडळ देवगडचे बुवा संतोष जोईल यांच्यात जुगलबंदी रंगणार आहे. लोके यांना योगेश सामंत हे पखवाज तर संदेश सुतार हे तबला साथ करणार आहेत. जोईल यांना शाम तांबे हे पखवाज तर अक्षय मेस्त्री हे तबला साथ करणार आहेत. याच दिवशी ‘खेळ पैठणीचा’ हा खास महिलांसाठी कार्यक्रम होणार आहे. यासाठी सुजाता कोरगावकर किंवा अपेक्षा नाईक (मो. ९९७०६९५२८४) यांच्याशी संपर्क साधावा.
शुक्रवार दिनांक ३० रोजी खुल्या गरबा /दांडिया स्पर्धा होणार आहेत. शनिवार दिनांक १ रोजी वेशभूषा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा खुला गट, पहिली ते पाचवी गट, सहावी ते दहावी गटात होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे २२२२, ११११, ७७७ रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी अभय नाईक (मो. ९८६०८११०२६), समीर सातार्डेकर (मो. ९५६१०५६९९९), साईप्रसाद काणेकर (मो. ९९२३०४२२४२) यांच्याशी संपर्क साधावा. रविवार दिनांक २ रोजी खुल्या गटात रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३३३३, २२२२, ११११ रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी अभय नाईक (मो. ९८६०८११०२६), समीर सातार्डेकर (मो. ९५६१०५६९९९), साईप्रसाद काणेकर (मो. ९९२३०४२२४२) यांच्याशी संपर्क साधावा. याचदिवशी खुल्या गटात चित्रकला व रंगभरण स्पर्धा होणार आहे. नावनोंदणीसाठी मंगलदास साळगावकर (मो. ९४२३३१८७६६) यांच्याशी संपर्क साधावा. जितू पाटील, कोल्हापूर यांचे करा ओके गायन होणार आहे.
सोमवार दिनांक ३ रोजी धमाल विनोदी नाटक ‘शांतेच कार्ट चालु आहे’ सादर होणार आहे. मंगळवार दिनांक ४ रोजी गोवा येथील ‘स्टार मेलोडीज’ हा संगीत रजनीचा (ऑर्केष्ट्रा) कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजता पाककला स्पर्धा होणार आहे. अपेक्षा नाईक (मो. ९९७०६९५२८४) यांच्याशी संपर्क साधावा. बुधवार दिनांक ५ रोजी ढोल पथक व डीजेच्या तालावर दुर्गामातेची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या नवरात्र उत्सवात भाविकानी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व श्री देवी दुर्गा मातेचे कृपा आर्शिवाद घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष नाना शिरोडकर यानी केले.
फोटो :-

You cannot copy content of this page