कणकवली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन

⚡कणकवली ता.२५-: एकात्म मानववादाचे प्रणेते,पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय कणकवली त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष राजन चिके,महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा ढवण, नगरसेवक शिशिर परुळेकर,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पप्पू पुजारे, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे,महिला शहर अध्यक्ष प्राची कर्पे, शक्ती केंद्रप्रमुख सदानंद चव्हाण,प्रसाद देसाई, अजय घाडीगांवकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page