⚡देवगड ता.२४-: विजयदुर्ग रामेश्वर समुद्र किनारी जहाज बुडीनंतर शनिवारी सकाळी पहिल्यांदा किनाऱ्यावर डाबर सदृश पदार्थ यायला सुरवात झाली असुन या समुद्र किनारी उपजिल्हाधिकारी ( रोहयो ).आविशकुमार सोनोने , तहसिलदार श्रीकृष्ण ठाकुर , देवगड गटविकास अधिकारी . अरूण चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर करावयाचे उपाय योजनेबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायतीशी सुसंवाद साधला .
या आपत्कालीन परिस्थितीशी सर्वानी एकत्र येऊन सामना करूया असे आवाहन प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधताना केला . सकाळच्या सत्रात डांबर सदृश पदार्थ ग्रामपंचायत विजयदुर्ग , महसुल विभाग , कोस्टल अधिकारी , कर्मचारी, ग्रामसुरक्षादल विजयदुर्ग व ग्रामस्थांच्या साहाय्याने समुद्र किनारा साफ करण्यात आलेला होता त्यानंतरही दुपारच्या सत्रातही किनाऱ्यावर डाबर सदृश पदार्थ आल्याने त्या दृष्टीनेही प्रशासनाने नियोजन करण्यात आलेल आहे . रामेश्वर किनारी भागातही याचा परीणाम दिसला असुन या भागातही तहसिलदार श्रीकृष्ण ठाकुर , गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी भेट देत तेथील ग्रामस्थ , सरपंच .विनोद सुके , तसेच ग्रामसेवक आदीत्य कदम यांच्याशी सुसंवाद साधत नियोजन केल . यावेळी या नियोजनात पंचायत समिती देवगड कृषि अधिकारी श्री दिगंबर खराडे, विस्तार अधिकारी . निलेश जगताप , विजयदुर्ग उपसरपंच महेश बिडये, विजयदुर्ग ग्रामसेवक .ए.डी.वारे, विजयदुर्ग तलाठी विनायक तानवडे , गिर्ये तलाठी .दत्ता ढाके , वाघोटन तलाठी प्रमोद कोळपकर , ग्रा.प सदस्य . रियाझ काझी ,पोलीस पाटील .राकेश पाटील , लिपीक सुनिल सारंग, कोतवाल प्रितेश डोंगरे , तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते .
