जिल्हास्तरीय स्वरचित काव्य स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२४-:
नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे कवी स्व. शरद साटम यांच्या स्मृति प्रित्यर्थ जिल्हास्तरीय कवी शरद साटम स्वरचित काव्य स्पर्धा रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी कविता स्वरचित व मराठी असावी. सामाजिक, प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. कविता दिर्घ नसावी. स्पर्धकाने आपल्या कवितेचे स्वतःच सादरीकरण करावयाचे आहे. स्पर्धा संपन्न होताच स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या कविता दि. १३ ऑक्टोबर पर्यंत पोहोचतील अशा रीतीने नगर वाचन मंदिर, सोमवार पेठ, मालवण, जि. सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवाव्यात किंवा समक्ष आणून द्याव्यात. अधिक माहितीसाठी संपर्क श्री. संजय शिंदे, ग्रंथपाल मोबा. ९४२२२३४९५० किंवा श्रेया चव्हाण सहा ग्रंथपाल मोबा. ८३९०६९४३३१ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संचालक उदयराव मोरे व नागेश कदम यांनी केले आहे.

You cannot copy content of this page