⚡मालवण ता.२४-: मूळ हडी पाणखोल जुवा गावचे सुपुत्र आणि भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास दाजी गोलतकर (वय ७४) यांचे शुक्रवारी कोल्हापूर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना अल्पशा आजाराने निधन झाले.
श्री. विलास गोलतकर हे नोकरीच्या निमित्ताने मुंबई डोंबिवली येथे राहत होते तर मुंबई ठाणे येथील सायन्स कॉलेज मध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी मलासेवा बजावली होती. विज्ञान विषयाचे गाढे अभ्यासक म्हणून ते ओळखले जायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हडी जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये झाले होते. तर मालवणच्या टोपीवाला हायस्कुल मध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले होते. एमएससी पर्यंत शिक्षण झालेले गोलतकर हे विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई या शिक्षण संस्थेवर ते गेली सहा वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. अलीकडे ते काही वर्षे पाणखोल जुवा या गावी राहत होते
त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, सुना असा परिवार आहे. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या आणि संस्था पदाधिकारी यांच्या वतीने श्री गोलतकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
