Global Maharashtra Breaking News

बेकायदेशीररित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी संशयितास जामीन मंजूर

सावंतवाडी ता.१३-:बेकायदेशीर रित्या दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बांदा तपासणी नाक्यावरून अटक केलेल्या मुंबई येथील युवकाला न्यायालयाने १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीतर्फे अँड परशुराम चव्हाण आणि अँड प्रिया गावकर यांनी काम पाहिले.

Read More

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्त्र मोदक नैवेद्यार्पण सोहळा

वैश्यवाडा येथील हनुमान मंदिर उत्सव समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजन ⚡सावंतवाडी ता.१३- : अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी वैश्यवाडा येथील हनुमान मंदिर उत्सव समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्त्र मोदक नैवेद्यार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे आहे. यनिमित्त सकाळी ६.३० वा. महापूजा, सकाळी ७.०० वा. सामुदायिक अर्थवशीर्ष पठण, दुपारी १.००…

Read More

वाफोली येथील प्रकाश परब यांच्या घराची कोसळली भिंत

दीड लाख रुपयांचे नुकसान;मुसळधार पावसामुळे कहर ⚡बांदा ता.१३-: मुसळधार पावसात वाफोली येथील प्रकाश नारायण परब यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घरातील व्यक्ति याठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. बांदा परिसरात गेले ४ दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. वाफोली येथील…

Read More

भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या मालवण शहर अध्यक्षपदी अशोक मोहिते

मालवण (प्रतिनिधी) भाजपच्या भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणे व सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शना नुसार सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या मालवण शहर मंडल अध्यक्ष पदी मालवण तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक अशोक मोहिते यांची निवड करण्यात आली. मालवण येथील भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष…

Read More

मालवण मधील निराधार व्यक्तीला अमेय देसाई यांनी मिळवून दिला अनाव अनाथाश्रमचा आधार…

मालवण (प्रतिनिधी) मालवण बाजारपेठेतील एकाकी जीवन व्यतीत करणारे वृद्ध व्यक्ती अरविंद रामचंद्र पोरे यांची मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी मित्र मंडळींच्या सहकार्याने अणाव अनाथाश्रमात व्यवस्था करून हक्काचा निवारा मिळवून देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. मालवण बाजारपेठ येथील वृद्ध रहिवासी अरविंद रामचंद्र पोरे हे एकटेच आपले जीवन व्यतीत करीत होते. ते एकेकाळी…

Read More

प्रसाद राणे यांना गुरुसेवा
सन्मान पुरस्कार प्रदान

⚡कणकवली ता.१२-:शालेय शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांच्या हस्ते विद्यामंदिर हायस्कूलचेकलाशिक्षक प्रसाद राणे यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.प्रसाद राणे हे गेली २० वर्षे विद्यामंदिर हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांकरिता ते सतत विविध उपक्रम राबवित असतात. त्यांचे अनेक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. याशिवाय सामाजिक पातळीवर लगद्यापासून पर्यावरणपूरक…

Read More

उंबर्डेतील इयत्ता नवित शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

⚡वैभववाडी ता.१२-: तालुक्यातील उंबर्डे मेहबुबनगर येथील शहीदराज नियाज फरास, वय १४ या इयत्ता नवित शिकणाऱ्या मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मामाच्या घरी विजेचे बटण सुरू करीत असताना रविवारी (दि.११ )रात्री ८ वा.हा प्रकार घडला. कणकवली येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. शहीदराज हा रविवारी सायंकाळी येथील मशिदीत नमाज पडून मामाच्या घरी काही…

Read More

उत्तम फोंडेकर यांचा ना. केसरकर यांच्यातर्फे सन्मान

⚡मालवण ता.१२-:मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा व्यावसायिक यांना नुकताच विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरील ऍग्रो आयडॉल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्याकडून फोंडेकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ना. दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित गुरुसेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात उत्तम…

Read More

शैक्षणिक प्रगतीवर गावाचा विकास अवलंबून

गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचे प्रतिपादन वैभववाडी संजय शेळकेशिक्षण घेत असताना व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. शैक्षणिक प्रगतीवरच गावचा विकास अवलंबून असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मियतेने शिकले पाहिजे. नवनवीन प्रयोग, संशोधन केले पाहिजे. ध्येय निश्चिती बरोबर मी शिस्तप्रिय नागरिक जे बनणार असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी…

Read More

पुतळा जाळत मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

⚡कणकवली ता.१२-:उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी देणाऱ्या ग्रीन रिफायनरी विरोधक आप्पा जोशी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी फिर्याद दिली असून दाखल फिर्यादीनुसार शिंदे गटाचे कार्यकर्ते शेखर राणे, बाळू पारकर, सुनील पारकर, भूषण परुळेकर, दामू…

Read More
You cannot copy content of this page