Headlines

आमदार निलेश राणे यांनी कै. सन्मेष परब, कै. अक्षय राणे कुटुंबियांचे केले सांत्वन

मालवण दि प्रतिनिधी : मासेमारी नौका समुद्रात उलटून दुर्दैवी मृत्यू पावलेल्या कै. सन्मेष परब, कै. अक्षय राणे यांच्या कुटुंबियांची आमदार निलेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

मालवण समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठिमागील खडकाळ परिसरात मासेमारीस गेलेली ‘सागरिका’ ही नौका लाटांच्या तडाक्यात सापडून मंगळवारी बुडाली होती .यात मालवण दांडी येथील मच्छिमार नेते तथा भाजपा मालवण उपाध्यक्ष असलेले नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता

आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी सन्मेष परब, अक्षय राणे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शिवसेना, भाजपा पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page