Headlines

आमदार निलेश राणें यांचेकडून कै. सरोज परब यांच्या कुटुंबियांचे सांत्वन!

मालवण दि प्रतिनिधी
आमदार निलेश राणे यांनी मसुरे येथे कै. सरोज परब यांच्या निवासस्थानी गुरुवारी भेट देऊन परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष सौ सरोज परब यांचे शनिवारी हृदय विकाराने निधन झाले होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सरोज ताईंच्या निधनाने आम्ही हक्काचा घरचा माणूस गमावल्याची भावना आहे. त्यांच्या निधनाची वार्ता खुप धक्कादायक आणि वेदनादायी होती. आम्ही सर्वजण परब कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत असे यावेळी सांगितले

यावेळी सरोज परब यांचे पती शिवाजी परब, मुलगी मालवण नगरपरिषद आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, मुलगा राहुल परब यांचे आमदार राणे यानी सांत्वन केले.

यावेळी माजी आमदार राजन तेली, मालवण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सोसायटी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, बाळू कुबल, बाबा परब पं. स. सदस्य छोटू ठाकूर, महेश बागवे, शिवसेना संपर्क प्रमुख राजेश गावकर, किसन मांजरेकर, अशोक बागवे, पंढरीनाथ मसुरकर, तात्या हिंदळेकर, नागेश चव्हाण, गणेश परब, वैभव येसजी, अनिल सावंत,प्रवीण पेडणेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page