⚡सावंतवाडी, ता. २९ -: भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा शहर प्रवक्ते ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांचा वाढदिवस सावंतवाडी भाजप शहर कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ॲड. भांबुरे यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.”

