Headlines

“आचिर्णेतील श्री रासाई मंदिरात ३० ऑक्टोबरला आबासाहेबांचे जाहीर हितगुज…

मानवी जीवनातील विविध समस्या व संकटांवर होणार मार्गदर्शन; जिल्हाभरातील स्वामी समर्थ सेवेकरी, भाविक व ग्रामस्थांना उपस्थितीचे आवाहन..

⚡वैभववाडी ता.२९-: श्री स्वामी समर्थ व प. पू. गुरुमाऊली यांच्या आज्ञा आशिर्वादाने श्री रासाई मंदिर आचिर्णे या ठीकाणी शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2026 सायंकाळी ठीक 5 वाजता गुरुवर्य प. पू. गुरुमाऊली यांचे सुपुत्र आदरणीय श्री आबासाहेब यांचे जाहीर हितगुज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व गावातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी भाविक भक्त ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
‌‌हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधुन मानवी जीवनातील अनेक समस्या जसे लक्ष्मी प्राप्तीचे प्रश्न, वाढत चाललेली व्यसनाधीनता, नोकरी विषयी समस्या, शेती विषयी समस्या, देव देव्हारा माहिती, ग्रमदैवत/ कुलदैवत/ इष्टदैवत/ सेंद्रीय दैवत यांची माहिती, येणारे मानवी स्वरूपातील किंवा नैसर्गिक स्वरूपातील संकटे यांवरती घ्यावयाची दक्षता व सेवा, वाढती महागाई, स्वपरोजगार विभागा अंतर्गत बचत गट/ छोटे मोठे व्यावसाय बद्दल मार्गदर्शन, विवाहाचे प्रश्न अश्या अनेक प्रश्नांवर आपल्याशी हितगुजातुन संवाद साधला जाणार आहे.
सर्व कामे बाजूला ठेवून शुक्रवार दिनांक ३०/१०/२०२६ रोजी सायंकाळी ठीक ०५:०० वाजता या कार्यक्रमाला २ ते ३ तासासाठी तीरी सर्वांनी आवश्यक भेट द्यावी.*श
कार्यक्रमातून आदरणीय आबासाहेब यांचे मिळणारे ज्ञान एका छोट्या वहीत उतरवून किंवा मोबाईल रेकॉर्ड करून आपण हे अमृतमय असे ज्ञान आपल्या जीवनात उतरवून घ्यावे व सुखाच्या वाटेवरती एक पाऊल पुढे चालाव.

You cannot copy content of this page