तिहेरी उडीमध्ये कु.धनराज मंगेश घाडीने केली सुवर्ण पदकाची कमाई

⚡देवगड ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक, सामजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या देवगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही आपल्या यशस्वी कामगिरीची मोहर उठवली आहे. मुंबई विद्यापीठ आयोजित विभाग स्तरवरील क्रीडा स्पर्धा नुकत्याच मुंबई येथील विद्यापीठ क्रीडांगणावर संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपला यशस्वी सहभाग नोंदविला
तिहेरी उडी या क्रीडा प्रकारात धनराज मंगेश घाडी या SY BSc.IT मधील विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त करीत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. युवराज नाना जोई्ल ( M.Com.I)याने गोळाफेक मध्ये आणि आदित्य संतोष कदम (M.Com.I)याने थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आणि दोघांनाही रौप्य पदकाची प्राप्ती झाली. रेणुका विलास राणे ( M.Sc.Phy.) या विद्यार्थिनीने उंच उडी या क्रीडा प्रकारात तिसरे स्थान प्राप्त करून, कांस्य पदकाची प्राप्ती केली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. प्रशांत राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांबळे, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कौतुक केले आहे. तसेच शिक्षण विकास मंडळ, देवगडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील सर्वांचे अभिनंदन केले आहे.
फोटो-विजेत्यांचा सन्मान करताना मान्यवर

You cannot copy content of this page