रोटरीच्या वक्तृत्व स्पर्धेत सम्राट राजे व विधीशा कुबल प्रथम

⚡मालवण ता.१७-: रोटरी क्लब मालवण तर्फे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवन प्रवासावर आधारित शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील पाचवी ते सातवीच्या गटात विधीशा कुबल (दांडी शाळा) हिने तर आठवी ते दहावी गटात मालवणच्या भंडारी ए सो हायस्कुलचा सम्राट बाबुराव राजे याने प्रथम क्रमांक पटकाविला.

मालवण येथील कन्याशाळेमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मालवणमधील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून लाल बहादूर शास्त्रीजींचा जीवनप्रवास उलगडला. या स्पर्धेत पाचवी ते सातवी गटामध्ये द्वितीय क्रमांक – सेजल बिरमोळे (भंडारी हायस्कुल), तृतीय क्रमांक – फरीन मलिक (कन्याशाळा) यांनी मिळवला. तर आठवी ते दहावी गटामध्ये द्वितीय क्रमांक – सिद्धी देऊलकर (रेकोबा हायस्कुल), तृतीय क्रमांक – आयुष म्हापणकर, (कुडाळकर हायस्कुल), उत्तेजनार्थ –जागृती पारकर (रेकोबा हायस्कुल) यांनी यश मिळविले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर आणि सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र वराडकर यांनी काम पाहिले .

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते काल पार पडला. विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लब मालवणचे असि.गव्हर्नर नीता गोवेकर, अध्यक्ष रतन पांगे ,सेक्रेटरी अभय परब, डॉ .अजित लिमये, डॉ .लीना लिमये, प्रदीप जोशी ,निलम जोशी ,भाऊ साळगावकर ,सुहास ओरसकर ,उमेश सांगोडकर ,महेश काळसेकर रमाकांत वाक्कर ,प्रसन्न मयेकर ,महादेव पाटकर रंजन तांबे तसेच विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page