सिनेटच्या निवडणुकीकरिता युवासेनेची मोर्चेबांधणी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत

⚡कणकवली ता.१७-: सिनेटच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू व पवन जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

याबाबतची युवा सेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी अंकित प्रभू यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. उमेदवारी अर्ज कसे भरायचे, सिंधुदुर्गात मतदान केंद्र कुठे असणार त्याकरिता मतदान कसे करायचे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी युवासेना पदाधिकाऱ्यांसोबत श्री. प्रभू व जाधव यांनी संवाद साधला. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, रुची राऊत, गितेश राऊत, राजू राठोड, हर्षद गावडे, गुरुनाथ पेडणेकर, युवा सेना कणकवली तालुका प्रमुख ललित घाडीगावकर, सिद्धेश राणे आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page