लायन्स क्लबच्या वेशभूषा स्पर्धेत मंदिरा पांजरी प्रथम

⚡मालवण ता.१७-: बालदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब मालवण तर्फे मालवण देऊळवाडा प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत २० मुलांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रथम क्रमांक – मंदिरा पांजरी (झाशीची राणी), व्दितीय क्रमांक – संभव अटक (लालबहादूर शास्त्री), तृतीय क्रमांक- जान्हवी पाटकर (सावित्रीबाई फुले) यांनी पटकाविला.

विजेत्यांसह सर्व मुलांना सहभागाबद्दल बक्षीस व खाऊ देण्यात आले. यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष सौ. वैशाली शंकरदास, खजिनदार सौ. अंजली आचरेकर, सदस्य सौ. जयश्री हडकर, सौ. राधिका मोंडकर, सौ. दिक्षा गांवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page