रोटरीच्या वक्तृत्व स्पर्धेत दांडी शाळेची विधिशा कुबल प्रथम

⚡मालवण ता.१७-: भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहाद्दुर शास्त्री यांचा जीवन प्रवास या विषयावर रोटरी क्लब मालवणतर्फे आयोजित केलेल्या वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये ५ वी ते ७ वी या गटात मालवण दांडी येथील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी विधिशा रामचंद्र कुबल हीने प्रथम क्रमांक मिळविला. विधिशाला रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी रोटरीच्या असिस्टंट डिस्ट्रिक गव्हर्नर नीता गोवेकर, मालवण रोटरी क्लब अध्यक्ष रतन पांगे, सेक्रेटरी अभय कदम, डॉ.अजित लिमये, डॉ.लिना लिमये, सदस्य महेश काळसेकर, प्रसन्ना मयेकर, शिवराज सावंत, सहभागी विद्यार्थी व रोटरी सदस्य उपस्थित होते. विधिशा कुबल हिला दांडी शाळेचे शिक्षक शिवराज सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिक सौ.विशाखा चव्हाण, सौ.मनिषा ठाकुर, रामदास तांबे, शाळा व्यवस्थापन समिती दांडी शाळा, पालक व ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page