व्ही एन नाबर इंग्लिश स्कूलमध्ये बाल दिन साजरा

बांदा ता.१७-:

बांदा येथील व्ही. एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूल प्रशालेत 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा करण्यात आला, यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई मॅडम यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.


या निमित्त खास मुलांसाठी विविध मनोरंजन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांसाठी रोलिंग द बॉल, मुलीच्या चित्रास टिकली लावणे बोंबार्डिंग द सिटी यासारखे विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई मॅडम यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी नृत्य, गाणी सादर करून त्यांचे मनोरंजन केले.त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे प्री- प्रायमरी सेक्शन मध्ये देखील बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, पासिंग द बॉल खेळ घेण्यात आले. अशाप्रकारे प्रशालेत बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page