⚡सिंधुदुर्गनगरी ता १७-: जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू करून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहित्यामुळे हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असून आचारसंहिता संपताच २६ डिसेंबर पासून बेमुदत उपोषणाचे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती आंबा ,काजू बागायतदार शेतकऱ्याचे संघटक शामसुंदर राय यांनी दिली आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू ,बागायतदार शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी सातत्याने निवेदने दिली जात आहेत १ मे ला उपोषण करण्यात आले ,त्यानंतर मोर्चा काढण्यात आला परंतु प्रत्येकवेळी आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही महाविकास आघाडी असो किंवा युती सरकार असो नेते मंडळीकडून आश्वासने दिली पण त्याची पूर्तता झालेली नाही त्यामुळे आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला व १८ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद उपोषण सुरू करण्यात येणार असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते परंतु सध्या ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने आंदोलन करू नये अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली त्यामुळे त्याच्या विनंतीचा मान राखून १८ नोव्हेंबर पासूनचे बेमुदत उपोषणाचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे .
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत न्याय मिळे पर्यत आपली आंदोलनाची भूमिका कायम आहे त्यामुळे उपोषण तूर्त स्थगित केले असले तरी निवडणूक आचारसंहिता संपताच २६ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुद उपोषण सुरू करणार अशी माहिती शेतकरी संघटक शामसुंदर राय यांनी दिली आहे.
