बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली

स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार आम्ही जपतोय उमेश येरम

⚡वेंगुर्ला ता.१७-: शालेय शिक्षण मंत्री नाम श्री दीपक केसरकर यांच्या वेंगुर्ला तालुका संपर्क कार्यालय व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वेंगुर्लेतील पक्ष कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

वेंगुर्ला सप्तसागर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात ऊपशहर प्रमुख श्री उमेशजी येरम यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करतेवेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे श्री सिद्धेश टेमकर, श्री बाळू सावंत जिल्हा कार्यकारणी सदस्य,श्री राजू परब, श्री जगदीश सावंत, श्री अजित गावडे, श्री प्रणव सावंत मयुरी आरोलकर आदी उपस्थित होते.

स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार जपत,
ऐशी टक्के समाजकारण आणि विस टक्के राजकारण करत समाजाची सेवा सदैव करत राहू असे प्रतिपादन शिवसेना उप शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले.
फोटो ओळी
बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना सर्व शिवसेनीक

You cannot copy content of this page