⚡सावंतवाडी ता.१७-: हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सावंतवाडी शिवसेनेच्या संचली पॅलेस येथील मध्यवर्ती कार्यालयात अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे या घोषणा देत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आले.यावेळी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी दीप प्रजननाने बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा तालुका महिला संघटक रश्मी माळवदे शहर महिला संघटक श्रुतिका दळवी अजित सांगेलकर राजू शेटकर, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार जावेद शहा विश्राम कांबळे राजा वाडकर राजू कुबल शेखर सुभेदार प्रशांत बुगडे बंड्या घोगळे समीरा शेख शहाणूसुभेदार अरुण गावडे विनोद ठाकूर श्रेया कास्कर अर्चना बोंद्रे मनाली परब सुनीता राऊळ नामदेव नाईक आदी उपस्थित होते
