बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन मालवण शाखेत उद्धव ठाकरे गटाकडून साजरा

मालवण (प्रतिनिधी)

‘अमर रहे अमर रहे, बाळासाहेब अमर रहे….. अश्या जोरदार घोषणा देत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनी मालवण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यालय येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून पूजन करत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. या निमित्ताने नारळाच्या रोपांचे वाटप नागरिकांना करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, मंदार केणी, संमेश परब, पंकज सादये, किरण वाळके, नरेश हुले, यशवंत गावकर, चंदू खोबरेकर, वासुदेव गावकर, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, दिलावर शेख, बाळा परब, विशाल भगत, गिरीष कांबळी, दिगंबर बगाड, दादू शिर्सेकर, बाबा मडये, दीपा शिंदे, तृप्ती मयेकर, निना मुंबरकर, रश्मी परुळेकर, अंजना सामंत, नंदा सारंग, लक्ष्मी पेडणेकर, निनाक्षी शिंदे यासह अन्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी भाई गोवेकर यांनी बाळासाहेबांच्या आणि शिवसेनेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे आणि मालवण मधील शिवसेना यांचे नाते आगळेवेगळे होते. मालवण मधील शिवसैनिकांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांनी पुकारलेल्या प्रत्येक आंदोलनात, लढ्यात सहभाग घेतला. मालवणचे शिवसैनिक कधीही कमी पडणार नाहीत. आजही मालवणात शिवसेनेचे चांगले काम सुरू आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असून वेगळं नाव ठेवून शिवसेना उभारण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही यावेळी भाई गोवेकर म्हणाले.

You cannot copy content of this page