Headlines

रेकोबा विद्यालयाच्या गौरांग मालंडकरची महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघात निवड

मालवण दि (प्रतिनिधी) : मालवण-वायरी येथील रेकोबा विद्यालयातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या गौरांग रामचंद्र मालंडकर याची महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे रेकोबा विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

उत्तर प्रदेश येथे दि. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड चाचणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे घेण्यात आली. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित या निवड चाचणीत राज्यातील विविध खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या चाचणीत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गौरांग मालंडकर याने महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील राज्य संघात स्थान मिळविले.

गौरांग हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने आपल्या खेळातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर ही निवड निश्चित केली. त्याला रेकोबा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

गौरांगच्या या यशाबद्दल रेकोबा विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page