आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला; आम. नितेश राणे
⚡कणकवली ता.०७-: भाजपा युतीचे राज्यात सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळाला. आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये सर्वात जास्त त्रास कणकवली मतदार संघाला दिला गेला. कणकवली, देवगड, वैभववाडी येथील विकास कामे रखडवली गेली. शासकीय निधी देण्यास सातत्याने टाळाटाळ…
