⚡मालवण ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. या निमित्ताने मालवण दौऱ्यात असलेल्या मंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व मित्रमंडळी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर आदींसह यावेळी निषय पालयेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर तसेच ललित चव्हाण, गौरव लुडबे उपस्थित होते.
