⚡मालवण ता.०७-: पोईप आदर्श रिक्षा संघटना व ग्रामस्थ पोईप यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त सायंकाळी ५ वा. पोईप गावातील ग्रामस्थांची संयुक्त भजने, रात्री ८ वा. डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला असून बुवा संदीप लोके विरुद्ध बुवा अरुण घाडी यांच्यात डबलबारी सामना रंगणार आहे.
तरी सर्वानी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोईप आदर्श रिक्षा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
