मालवण दि प्रतिनिधी
जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी देवगड, आणि वैभववाडी या पाच सहकारी खरेदी विक्री संघांसह मालवण येथील सिंधुदुर्ग डिव्हिजनल पोस्टल एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त यांच्या मान्यतेने जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालाकडून जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर या निवडणुका होणार आहेत.
मालवण आणि वैभववाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मालवण खरेदी-विक्री संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची मुदत १२ ते १८ ऑक्टोबर आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्ह वाटपासह अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. तर वैभववाडी खरेदी-विक्री संघासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १४ ऑक्टोबर आहे. २ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्ह वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.. सावंतवाडी खरेदी-विक्री संघाची निवडणूक १२ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशने दाखल करण्याची मुदत आहे.
२ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्ह वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. देवगड खरेदी-विक्री संघाची निवडणूक १५ नोव्हेंबरला होणार आहे. ११ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशने दाखल करण्याची मुदत आहे. ३ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्ह वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दोडामार्ग खरेदी-विक्री संघाची निवडणूक १७ नोव्हेंबरला होणार आहे. १२ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशने दाखल करण्याची मुदत आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्ह वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पोस्टल संस्थेची निवडणूक १२ नोव्हेंबरला
मालवण येथील सिंधुदुर्ग डिव्हिजनल पोस्टल एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक १२ नोव्हेंबरला होणार आहे. १० ते १४ ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशने दाखल करण्याची मुदत आहे. २ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्ह वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
