मालवण (प्रतिनिधी)
मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात रविवार दि. ९ ऑक्टोबर पासून कार्तिकी स्नान व काकड आरती उत्सवास प्रारंभ होत आहे.
भरड येथील दत्त मंदिर हे एकमुखी दत्ताचे मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मंदिरात दरवर्षी दत्त जयंती उत्सव, गणेशोत्सव, कार्तिकी स्नान उत्सव यासह कीर्तन पंचक, भजने, दशावतारी नाट्यप्रयोग असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात. या मंदिरातील कार्तिकी स्नान व काकड आरती उत्सवासही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यावर्षीही दि. ९ ऑक्टोबर पासून दत्त मंदिरात कार्तिकी स्नान व काकड आरती उत्सवास प्रारंभ होत आहे. पहाटे ५. १० वा. कार्तिकी स्नान व आरतीला सुरुवात होणार आहे. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन करणयात आले आहे.
