बावशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक प्रतिष्ठान अध्यक्षपदी विलास कांडर तर कार्यवाहपदी समीर मयेकर
⚡कणकवली ता.१९-: बावशी गावचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बावशी सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक प्रतिष्ठानची स्थापना नव्याने करण्यात आली आहे. सदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विलास कांडर तर कार्यवाहपदी गावचे पोलीस पाटील समीर मयेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कणकवली तालुक्यातील बावशी गाव हा विकासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेला गाव म्हणून ओळखला जातो. भौगोलिक दृष्ट्या निसर्गाच्या कुशीत…
