तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केली बांदा आळवाडीची पाहणी

रात्री घुसले होते मच्छीमार्केटमध्ये पाणी:स्थानिकांना अलर्ट राहण्याच्या केल्या सूचना

बांदा/प्रतिनिधी
तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट येथे रात्री उशिरा शिरल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः बांद्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात.


काल मुसळधार पाऊस कोसळल्याने तेरेखोल नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते मच्छिमार्केट रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच आळवाडी येथील मच्छिमार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर स्थानिकांना सावध करण्यासाठी तहसीलदार पाटील स्वतः बांदा शहरात आलेत

. त्यांनी तब्बल दोन तास याठिकाणी थांबून स्थानिकांना सावधानतेच्या सूचना दिल्यात. तसेच स्थानिक प्रशासनाला देखील अलर्ट राहण्याबाबत सूचना दिल्यात. यावेळी त्यांनी पुरस्थितीची माहिती जाणून घेतली. शहरातील पूर बाधित क्षेत्राची त्यांनी पाहणी केली.
यावेळी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तलाठी फिरोज खान, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page