सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी…

राजन तेली ; मी इच्छुक असलो तरी वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य

सावंतवाडी ता.१९-: मी जरी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून इच्छुक असलो तरी वरिष्ठ नेते ठरवतील तो निर्णय अंतिम मानला जातो परंतु आम्ही ही जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही वरिष्ठांकडे देखील मागणी केली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.

दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ जिल्हाध्यक्ष पदावर काम करायला संधी दिली त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे सर्व मंडल अध्यक्ष सर्व सरचिटणीस जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो असल्याची ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

यावेळी संजू परब,मनोज नाईक,आनंद नेवगी,रवि मडगावकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page