बबन साळगावकर; बाहेरुन गेल्यास शहरावर नुकसान
⚡सावंतवाडी ता.१९-: संकेश्वर सावंतवाडी रेडी रस्ता हा सावंतवाडीतूनच गेला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनच नागरिकांसह आमची भूमिका आहे परंतु सध्या स्थितीत त्यात बदल केल्याचं समजतं त्यामुळे एक प्रकारे हा नागरिकांवर अन्य असून यात शहराचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटनेंना तसेच सर्व राजकीय पदाधिकारी व व्यापारी वर्गाला एकत्र करून बैठक बोलवून पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान मुंबई गोवा हायवे रस्ता हा शहराच्या बाहेरून गेल्यानंतर याचा फटका शहराचा आर्थिक घडीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यातच आता संकेश्वर बांदा हा रस्ता देखील बाहेरून गेला तर शहराची आरती घडी विस्कटणार आहे अशी भीती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
