वाढीव नुकसान भरपाई देण्याची संतोष मोर्यें यांची मागणी
⚡दोडामार्ग,ता.१८-: मोर्ले येथे हत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्याने केळी, फणस, भेडले माड यांचे नुकसान केले. विद्युत तारा तुटून रस्त्यात पडल्याने वस्तीची केर मोर्ले दोडामार्ग एसटी अर्धा तास थांबून राहिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.नंतर अजित गवस,संतोष चिरमुरे, उमेश चिरमुरे,नारायण गवस,प्रकाश कांबळी आदींनी भेडले माड तोडून रस्ता मोकळा केला आणि वाहतूक पूर्ववत झाली.
दरम्यान,गेले दोन दिवस तो टस्कर मोर्ले गावातच फिरत आहे.सोमवारी रात्रीही तो वस्तीत फिरत होता.त्याने रात्री एका शेतकऱ्याचे फणसाचे झाड जमिनदोस्त केले तर एका शेतकऱ्याच्या रस्त्याला लागून असलेल्या घराशेजारील केळी रोपांची नासधूस केली.
दरम्यान, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.गेल्या काही वर्षात स्थानिक आमदार,मंत्री यांनी शेतकऱ्यांना वाढीव दराने हत्ती नुकसान भरपाई देण्याचा शब्द दिला होता तो काही पूर्ण झालेला नाही.त्यामुळे या अधिवेशनात तरी जिल्ह्यातील आमदारांनी वाढीव भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मोर्लेतील हत्तीग्रस्त शेतकरी संतोष मोर्ये यांनी केली आहे.
