विजय नाईक – रॉय यांनी आईच्या स्मरणार्थ केली मदत
वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरवाचनालयाचे हितचितक श्री. विजय गुरुनाथ (नाईक) रॉय यांनी आपली आई कै.सौ.तिलोत्तमा वासुदेव नाईक यांच्या स्मरणार्थ २५ हजार रुपयांची देणगी संस्थेस दिली आहे. रॉय या संस्थेच्या वर्गणीदार सभासद असून त्यांनी संस्थेचा अहवाल वाचून व कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी ही देणगी दिली आहे. या देणगीबद्दल कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी आभार मानले.
