मिलाग्रिसमध्ये शालेय परिवहन समितीची सभा संपन्न….

⚡सावंतवाडी ता.१९-: शालेय परिवहन समितीची सभा दिनांक १५ जुलै रोजी मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाली सभेची सुरुवात प्रार्थनेने झाली. प्रास्ताविकात परिवहन समितीची माहीती व सभेचा उद्देश उपस्थितांना सांगण्यात आला. तसेच सभेचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे, शिक्षक व वाहन चालक यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री सुरज पाटील हे उपस्थित होते. तर वाहन चालकांशी संवाद साधण्यासाठी श्री राजेंद्र राणे हे कॉन्स्टेबल उपस्थित होते.

तसेच श्री रामचंद्र साटेलकर ,श्री.मयुर सावंत, श्री नाईक, हे इतर कॉन्स्टेबल उपस्थित होते.

या पाहुण्यांचा परिचय शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी केला. प्रथम सूरज पाटील यांनी वाहन चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी आवाहन करुन त्यांच्याशी संवाद साधला .

सायबर क्राईम विषयी सावध केले. त्यानंतर प्रमुख वक्ते श्री. राजेंद्र राणे यांनी वाहनचालकाना देवदूताची उपमा देऊन वाहन चालक व परिवहन कार्यालयाचे नाते स्पष्ट केले.

वाहनात योग्य विद्यार्थी संख्या असावी, वाहन योग्य स्थितीत असावे, योग्य ठिकाणी गाड्या पार्क करणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. विद्यार्थी वाहतुकिसाठी असणारा विशेष परवाना या विषयी माहिती दिली .सभेचे अध्यक्ष फादर रिचर्ड सालदान्हा यांनी शाळा आणि वाहनचालक यांच्यातील माहितीच्या देवाण घेवाण संदर्भात मनोगत व्यक्त केले. सर्व वाहनचालकांना एक वॅाट्स अॅप ग्रुप तयार करणे व माहितीची देवाण घेवाण करणे आवश्यक असल्याचे सांगितले . तसेच सर्व वाहन चालकांना प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) देण्याचे आश्वासन दिले.शाळेच्या व समितीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे श्री जोशी सर यांनी आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page