Headlines

Global Maharashtra Breaking News

दुग्ध सहकार विभागातून अखेर 6 वर्षानंतर श्री.धुमाळ यांची बदली

⚡कणकवली ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा दुग्धव्यवसाय विकास खात्यातील(पदुम) दुग्ध मत्स्य.सहकारी संस्थांचे उत्कृष्ट कामकाज पाहणारे सहकारी अधिकारी श्री.एम.एस.धुमाळ यांची अखेर 6 वर्षानंतर त्यांच्या मूळ सिंधुदुर्ग जिल्हा सहकार खात्याकडे बदली झाली आहे. श्री.धुमाळ हे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असून त्यांनी दुग्ध सहकारी संस्था,मत्स्य सहकारी संस्था व इतर संस्थांचे कामकाज हाताळताना सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला.तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या…

Read More

बांधकाम कागरांच्या २०१९-२० चे प्रलंबित लाभ प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही होणार

भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नाला यश ⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९-२० चे आर्थिक लाभाचे प्रलंबित ऑफलाइन लाभ प्रस्ताव येत्या १५ दिवसात सादर करून मंजुरीचे प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही साहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाअध्यक्ष भगवान साटम यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भारतीय…

Read More

बचतगट, महिला, शेतकरी यांची झाली अभ्यास सहल

१५ वा वित्त आयोगाने आयोजन बांदा/प्रतिनिधीकोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत आवळेगाव ओरोस खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वा वित्त आयोग अंतर्गत गावातील बचत गट, महिला व शेतकरी वर्ग यांच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यांतर्गत एकदिवसीय अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गावातील महिलांनी मोठ्या संख्येने घेतला.यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. पूर्वा सावंत, उपसरपंच विवेक…

Read More

पावसापूर्वीच विजेच्या लपंडावाने व्यापारी हैराण

विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा व्यापारी संघाचा इशारा मालवण दि प्रतिनिधीपावसाच्या वातावरणानेच आचरा गावात मंगळवार पासून विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. यामुळे वाढत्या उष्णतेने हैराण झालेल्या ग्रामस्थांसोबत व्यापारयांनाही याचा फटका बसत आहे. यामुळे तातडीने विद्यूत पुरवठा सुरळीत झाल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा व्यापारी बांधवांनी दिला आहे. मंगळवार पासून आचरा भागात पावूस पडला नसलातरी अधूनमधून पावसाळी ढग…

Read More

दैवज्ञ व सराफ. समाज आयोजित कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

मालवण दि प्रतिनिधी दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण आणि मालवण तालुका सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दैवज्ञ भवनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिक, कारागीर वर्गासाठी हॉल मार्क आणि HUID विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून व्यावसायिक या कार्यशाळेला उपस्थित होते. भारतीय मानक ब्यूरो मुंबई 2 चे विभागीय अधिकारी नरेश…

Read More

जनतेच्या सहकार्यानेच पोलिसांचे काम सुलभ

डी वाय एस पी विनोद कांबळे वैभववाडी संजय शेळके :जनतेच्या सहकार्यामुळेच पोलीस खात्याचे काम अधिक सुलभ होते. आपत्तीच्या काळात जनतेने प्रशासनाला असेच सहकार्य करत राहावे. करुळ सह्याद्री रक्षक व ग्रामरक्षक दलाचे काम कौतुकास्पद आहे. भविष्यात या दलाची दखल निश्चित प्रशासन घेईल असे प्रतिपादन कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले.करुळ ग्रामपंचायत सभागृहात सह्याद्री रक्षक…

Read More

वादळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना द्या…

हरी खोबरेकर ; तहसीलदारांकडे मागणी… ⚡मालवण ता.३१-: हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ५ जून ते ७ जून या कालावधीत किनारपट्टी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

Read More

आचरा ग्रामंचायत येथे सौ अनुष्का गांवकर,श्रीमती पूजा आचरेकर यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित

⚡मालवण ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार माजी ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर व महिला बचत गटाच्या श्रीमती पुजा आचरेकर यांना बुधवारी ग्रामपंचायत आचरा सभागृहात ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव व ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम…

Read More

मालवणातील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ‘घागर कळशी आंदोलन’ छेडू

युवक काँग्रेसचा नगरपालिकेला इशारा ⚡मालवण ता.३१-: मालवण नगरपालिकेतर्फे धामापूर नळपाणी योजनेद्वारे शहरात होणारा पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झाला असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मालवण नगरपालिकेसमोर घागर कळशी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज युवक काँग्रेसतर्फे नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला. मालवण शहरात नगरपालिकेतर्फे धामापूर नळपाणी योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा अनियमीत…

Read More

जलपर्यटन नियमावलीत बदल करून घेणे गरजेचे – महेश कांदळगावकर

⚡मालवण ता.३१-: जलपर्यटन बंदी विषयी परिपत्रकामुळे जी संभ्रमावस्था निर्माण होत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पर्यटन महासंघ, जलपर्यटन व्यावसायिक, मच्छिमार, व्यापारी वर्ग, पर्यटन व्यवसायासाठी निगडीत सर्व घटकांनी एकत्र येवून सर्वपक्षीय पाठपुरावा शासनाकडे करून या जलपर्यटन नियमावलीत बदल करून घेणे गरजेचे बनले आहे, असे मत मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. दहा…

Read More
You cannot copy content of this page