घरीही सोडले:नागरिकांनी व्यक्त केले समाधान
आंबोली, ता.२०: हिरण्यकेशी नदी अतिपावसामुळे दुथडी भरून वाहत असल्याने गेळे येथे दोन्ही पुलांवर पाणी आल्याने संध्याकाळी घरी जात असणारा गेळे तील युवक समीर मारुती कदम हा अडकून राहिला.दोन्ही बाजूने पाण्याचा प्रवाह असल्याने त्याला पलीकडे जाता येत नहोते.यावेळी आंबोली पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर हवालदार दत्ता देसाई आणि नाईक दीपक शिंदे यांनी घटनास्थळी जात युवकाला बाहेर काढले.
यानंतर त्याला विचारपुस करून घरी नेऊन सोडण्यात आले.पोलिसांच्या तात्काळ मदतकार्याबद्दल ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
