घाटीवडेत मोरीची बाजूपट्टी वाहून गेली

मुसळधार पावसाचा फटका;वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी

⚡दोडामार्ग,ता.२०-: दोडामार्ग कोल्हापूर मार्गावरील वीजघर घाटीवडे येथील मोरीवर पाणी आल्याने रस्त्याची बाजूपट्टी वाहून गेली.त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. वाहनचालकांनी त्या मार्गावरून वाहने हाकताना खबरदारी घ्यावी असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

त्या मार्गावरून तिलारी घाट मार्गे जाणाऱ्या खासगी चारचाकी गाड्या अव्याहतपणे धावतात.त्या गाड्यांचे चालक जीपीएस मॅप वापरून येतात त्यामुळे रस्त्याची परिस्थिती त्यांच्या लक्षात येणे कठीण असते.त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने धोक्याची सूचना देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page